पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
नवी मुंबईत यशश्री शिंदे या युवतीची क्रूरपणे हत्या
मुंबई : नवी मुंबईत यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर मृतदेह आढळला. दाऊद शेख याने यशश्रीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
साताराः आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी
सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. चिमुकलीचा मृतदेह सापडला असून, संचिता साळुंखे (वय 22) ही महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर
मुंबई : वरळीत स्पामध्ये गुरु वाघमारे उर्फ सिधप्पा वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. गुरु वाघमारे याच्या हत्येत त्याच्याच प्रेयसीचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या प्रेयसीसह पाच जणांना अटक केली आहे.
पूराच्या पाण्यात बुडून श्रेया यादव हिचा मृत्यू
नवी दिल्लीः दिल्लीच्या राजेंद्रनगरमध्ये कोचिंग सेंटरमध्ये पूराचे पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील श्रेया यादव हिचा मृतांमध्ये समावेश आहे. या वर्षी एप्रिलमध्येच आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती. पण, दुर्देवाने तिचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
25 जणींसोबत लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ पोलिसांच्या ताब्यात
पालघर : लग्न जमवणाऱ्या संकेतस्थाळावरुन विधवा, घटस्फोटीत महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा फिरोज नियाज शेख (वय 43) याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एक दोन नव्हे तर 25 महिलांशी लग्न करुन त्यांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे. फिरोजकडून पोलिसांनी अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. यापूर्वीही तो सहा वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याचे कारनामे सुरुच राहिले.
चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबईः भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात विक्रोळी कन्नमवार नगर येथील पोलिस ठाण्यात तक्रार ही तक्रार दाखल केली आहे.
नवरा-बायकोचे भांडण अन् जीव गेला भाडेकरूचा
नागपूरः नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे भाडेकरुला भारी पडले आहे. घर मालकाने चाकू भोकसून भाडेकरुची हत्या केली आहे. पंकज सोलंकी असे हत्या झालेल्या भाडेकरुचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी घर मालकाला अटक केली आहे.
वाशीमध्ये हिट अँड रनची घटना, रिक्षा चालकाचा मृत्यू
नवी मुंबईः वाशीमध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झालाआहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिंधुदुर्गातील जंगलातून परदेशी महिलेची पोलिसांनी केली सुटका
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोणपाल जंगलात एका अमेरिकन महिलेला साखळदंडाने झाडाला बांधून ठेवल्याचे आढळून आले. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पाकिस्तानची एअर होस्टेस तस्करी करताना पकडली
नवी दिल्लीः पाकिस्तानच्या PIA ची एअर होस्टेस परदेशी चलनाची तस्करी करताना पकडली गेली आहे. एअर होस्टेसने तिच्या सॉक्समध्ये सुमारे 40 लाख रुपये किंमतीचे डॉलर आणि सौदी रियाल लपवले होते.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…