सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिच्याबाबत तिच्या बालमैत्रीणीने गौप्यस्फोट केला आहे. सीमा हैदरला लहानपणापासून ओळखत असून, ती फसवणूक करत आहे. सीमा हैदरच्या मैत्रीणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय युवक सचिन मीना या दोघांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा भारतात पोहोचली आणि तिने धर्म बदलून लग्न केले. सीमा आणि सचिन ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास आहेत. सीमा हैदरवर अनेक संशय आहेत, कारण ती बेकायदेशीर पद्धतीने भारतात आली आणि तिच्याकडे कागजपत्रेही नाहीत. एकीकडे सीमा हैदरवर गुप्तहेर आणि पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असल्याचा आरोप होत असताना आता तिच्या मैत्रिणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. सीमाची मैत्रीण असल्याचे सांगणाऱ्या एका युवतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीमा हैदरची पाकिस्तानी बालमैत्रीण असल्याचा दावा करणारी युवती म्हणाली की, ‘ती नाटक करतेय, आज ती हिंदू झाली, उद्या ख्रिश्चन होऊ शकते. सीमा हैदरला लहानपणापासून ओळखते, ती फसवणूक करत आहे. सीमा हैदरला खूप चांगल्याप्रकारे ओळखते आणि तिची कारस्थान माहिती आहेत. सीमा हैदर फसवणूक करत आहे. ती हिंदूस्तान आणि पाकिस्तानची फसवणूक करत आहे. सीमाने इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. पुढच्या काही दिवसांत पुन्हा धर्म बदलून ती ख्रिश्चनही होऊ शकते.’

‘सीमा सर्वांची अशाच प्रकारे फसवणूक करते. तिचे अनेक मित्र (पुरुष) आहेत. ती सर्वांसोबत असेच करते. सीमा नाटक करत आहे. ती कुठेही शांत बसणार नाही. सीमाने भारतात क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जाण्याची चर्चा केली होती. पण, तिथे जाऊन तिने नाटक सुरू केले आहे’, असाही आरोप मैत्रीणीने केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात आली होती. यानंतर सीमाला 4 जुलै रोजी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी सीमा आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर सीमा सचिनला भेटण्यासाठी सीमा पार करत थेट भारतात पोहोचली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!