सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

नवी दिल्लीः पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सध्या जोरदार चर्चेत आहे. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर मला आवडतो म्हणून मी सचिनवर प्रेम करते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा आवडता प्लेयर सचिन तेंडुलकर नाही, तर विराट कोहली आहे, असे सीमा हैदर हिने म्हटले आहे.

सीमा हैदर हिला गुप्तहेर, धोका देणारी पत्नी असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. सीमा केवळ क्रिकेट विश्वचषक बघण्यासाठी भारतात आली आहे आणि तो पाहिल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात आपल्या पतीकडे परत येईल, असा दावा एका पाकिस्तानी युट्यूबरने केला होता. याबद्दल बोलताना सीमा म्हणाली, जे लोक म्हणत आहेत की, मी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात आले आहे, तर हे चुक आहे. मला क्रिकेट आवडते पण एवढेही नाही. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर मला आवडतो म्हणून मी सचिनवर प्रेम करते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा आवडता प्लेयर सचिन तेंडुलकर नाही, तर विराट कोहली आहे.

सीमा म्हणाली, “विराट कोहली मलाच काय, संपूर्ण पाकिस्तानलाच आवडतो. मला त्याचा लूक, स्टाइल आणि क्रिकेट खेळण्याचा अंदाज खूप आवडतो. पण मी भारतात त्याच्यासाठी नाही, तर माझ्या प्रेमासाठी, अर्थात सचिन मीनासाठी आले आहे. काही यूट्यूबर्सनी तर सीमा हैदर दुबईतील एका बारमध्ये डान्सर होती, असा दावाही केला आहे. यावर सीमा म्हणाली, ‘मी कधी सिंध प्रांतातूनही बाहेर पडले नाही, तर दुबई दूरची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा सिंधबाहेर पडले, तेही केवळ सचिनला भेटण्यासाठी. मी कधीही दुबईला गेले नाही. अशा पद्धतीने बदनामी करू नका.’

दरम्यान, पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीणा यांनी नेपाळमध्ये लग्न केले. ती आपल्या चार मुलांसह भारतात राहात आहे. या अजब गजब प्रेमाची चर्चा होत असताना भारतात घुसखोरी किती सहज होते असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सीमा हैदर हिला यूपी एटीएसने ताब्यात घेतले होते. त्या चौकशीत तिने सचिनवर मनापासून प्रेम करत असल्याची कबुली दिली आहे. तसेच पाकिस्तानात परत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत सीमा आणि सचिनच्या प्रेमाची चर्चा होत असताना त्यांच्या घरमालकाने सचिन पाकिस्तानी असलेल्या सीमाला मारहाण करायचा, असे म्हटले आहे. सीमाला बीडी पिण्याचे व्यसन आहे. सचिन तिला बीडी पिण्यास मनाई करायचा. पण तिचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. त्यानंतर सचिन तिला मारहाण करायचा, असेही घरमालकाने म्हटले आहे.

सचिन आणि सीमाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन आणि सीमाने नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. पण या व्हायरल फोटोबाबत अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!