Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर

मुंबई : पाकिस्तानमधून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासाठी पळून भारतात दाखल झालेली सीमा हैदर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदर हिने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

सीमा हैदर हिने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून तिला आणि सचिन मीनाला अनेक ऑफर आल्या आहेत. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्या आहेत. सीमा हैदरने सोशल मीडियावर एका व्हिडीओमध्ये छोट्या पडद्यावरील ऑफरचा उल्लेख केला आहे. सीमाने सांगितले की, ‘रिअॅलिटी शो बिग बॉस आणि कॉमेडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला ऑफर आली आहे. पण तिला सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही. जर कोणत्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती देईल.’

दरम्यान, ऑनलाईन पबजी गेम खेळताना पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांची ओळख झाली. सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर चार महिन्यांपूर्वी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली होती. तेव्हापासून सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. सोशल मीडियावर सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते.

Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!