
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गरबा खेळत असताना गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुलासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशोक माळी यांचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अशोक माळी घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी… या गाण्यावर आनंदाने आपल्या मुलासोबत गरबा खेळत होते. गरबा खेळताना अचानक ते जमिनीवर कोसळले. जमीनीवर कोसळले त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी आहेत. अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. अशोक माळी हे गेल्या चार-पाच वर्षापासून गरबा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते. यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा भावेश देखील गेला होता. दोघे गरबा खेळताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…
हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…