Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी सीमा पब्जी खेळताना भारतीय युवक सचिन मीना याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तान सोडून भारतात गेली. सीमा आणि तिचा पती सचिन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. भारतीयांनी या जोडप्याला जितकं प्रेम दिले आहे, तितकंच त्यांना काही जणांनी ट्रोल देखील केले आहे.

सीमा आणि सचिन दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. सीमा भारतात येऊन आता बराच काळ लोटला आहे. पण तरीही लोक तिला एक प्रश्न विचारायचे थांबलेले नाहीत आणि तो म्हणजे ‘तिने सचिनमध्ये असं काय पाहिलं?’ पाकिस्तानातील काही लोकांनीही सीमासमोर हा प्रश्न उपस्थित केला आहे. सीमाने याआधी अनेकवेळा सांगितले आहे की, तिचे सचिनवर खूप प्रेम आहे आणि याच प्रेमामुळे तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. तरीही पुन्हा-पुन्हा तिला तोच प्रश्न विचारला जातो. यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकादरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती बाजूला बसलेल्या भारतीय महिलेला प्रश्न विचारताना दिसत आहे. ‘भारतात सौंदर्य आणि तरुणांची एतकी काय कमी होती की, सीमाला आवडून आवडून फक्त सचिनच आवडला?” त्याने पुढे विचारलं की, “सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं? सचिनमध्ये इतकं काय आहे?”

दरम्यान, सीमाला असे प्रश्न विचारणारी ही पहिली व्यक्ती नाही. याआधीही सीमाच्या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, सीमाला आता या सर्व गोष्टींची सवय झाली आहे. सचिन आणि तिच्या 4 मुलांसोबत आनंदाने जीवन जगत आहे. सीमाने भारतीय संस्कृतीचाही पूर्णपणे स्वीकार केला आहे. भारतात साजरा होणारा प्रत्येक सण देखील ती आनंदाने साजरा करते.

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!