डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

अहिल्यानगर : डिजिटल मीडिया हे पर्यायी माध्यम आहे. मात्र या माध्यमातही दर्जेदार व विश्वासार्ह मजकूर आवश्यक आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे भान जपायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर यांनी केले.

अहिल्यानगर येथील पत्रकारांतर्फे सोमवारी (ता. ६) सायंकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष धायबर यांनी ‘डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकारिता या विषयावर व्याख्यान दिले. संतोष धायबर यांनी डिजिटल मीडियात टिकून राहण्याचे तंत्र सांगितले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, रामदास ढमाले, अशोक सोनवणे, मन्सूरभाई शेख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, यू ट्यूब चॅनलचे पत्रकार, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष धायबर म्हणाले, ‘वेबसाईटवर दिलेला विषय (कंटेट) जर चांगला असेल तर त्याला वाचकसंख्या चांगली मिळते. मात्र, त्यात सातत्य असले पाहिजे. यू ट्यूबवरही चांगले विषय असतील तर व्हीडिओ पाहिले जातात. मोबाईलसोबतच प्रिंट मीडियाचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित राहील.’

पत्रकार संतोष धायबर यांनी प्रिंट मीडियातून डिजिटल मीडियाकडे झालेला त्यांचा स्वत:चा प्रवास उलगडला. संतोष धायबर हे गेल्या २७ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आहेत. www.policekaka.com, www.mahabharat.news, www.shirurtaluaka.com या वेबसाईटचे मुख्य संपादक तर ईश्वरी प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. संतोष धायबर यांनी लिहीलेली सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जात त्यांनी रिपोर्टिंग केले आहे. शिवाय, अनेक विषयांना वाचा फोडली आहे. विविध विषयांवर ते सातत्याने लिखान करत आहेत.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी पत्रकारांनी एकसंध राहण्याचे आवाहन केले. पत्रकारिता बदलली आहे. जुनी मुल्ये जतन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार संदीप कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सूर्यकांत नेटके यांनी करून दिला. ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी आभार मानले. यावेळी यू ट्यूब चॅनेल डिजिटल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा धायबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजयसिंह होलम यांनी स्वागत केले.

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!