
समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल जप्त…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (ता. 8) समोवार पेठ पोलिस चौकी जवळील समर्थ व्यायाम मंदिरासमोर केली.
सिद्दीक रफिक खान (वय 24 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे यांना माहिती मिळाली की, सोमवार पेठ पोलिस चौकी जवळ असलेल्या समर्थ व्यायाम मंदिरासमोर रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्दीक खान मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल (Pistol) व एक काडतूस असा एकूण 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर यापूर्वी एक शरिराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे.
संबंधित कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त संदिप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, पोलिस उप निरीक्षक सौरभ थारवे, पोलिस उप निरीक्षक अक्षयकुमार गोरड, पोलिस पोलिस उप निरीक्षक दिपक यादव व कर्मचारी सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस हवालदार प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहिदास वाघेरे, पोलिस नाईक रहीम शेख, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, अमोल शिंदे, वैशाली परदेशी, रागिनी शिंदे यांनी केली आहे.

समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…
धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…
पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…
रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

