ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पुणे (संतोष धायबर): पत्रकारितेत गेल्या 22 वर्षांपासून काम करत आहे. पण, स्पेशल बातम्यांशिवाय बाहेर कधी जाणे होत नव्हते. ऑनलाइन क्षेत्रात काम करत असल्यामुळे सदैव कॉम्प्युटर, लॅपटॉपला चिटकूण राहण्याची सवय. ऑफिस आणि घर…. एवढाच काय तो प्रवास. ऑफिसमध्ये काम करत असताना टेबल न्यूज, ब्लॉग, लेख, स्पेशल बातम्यांच्या गराड्यात. पण, ग्राऊंड रिपोर्टींगची मजा काही वेगळीच असते, हे अनेकांकडून ऐकायला मिळत होते. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन रिपोर्टींग केले. पण, निवडक बातम्याच… असो.

एक नोव्हेंबर पासून www.policekaka.com या संकेतस्थळाची संपादकपदाची जबाबदारी घेतली. नवे आव्हान समोर ठेवून माझ्या सहकाऱयांसोबत कामाला सुरवात केली आहे. ग्राऊंड रिपोर्टींग करणार आहे. पोलिसकाकांसोबत बोलणार आहे… लिहीणार आहे. लहानपणी खाकी वर्दी पाहिली की मनात धडकी बसत होती. पण, करिअरला सुरवात केल्यानंतर खाकी वर्दीबाबत आकर्षण वाटू लागले. पत्रकारितेत आल्यामुळे अनेक बातम्या लिहीण्याची संधी मिळाली. पोलिस, जवानांबद्दल आदर वाटू लागला. जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने  दिवस) हे पुस्तक लिहीण्याची संधी मिळाली. पुस्तक लिहीत असताना जवान किती लढवय्ये असतात, हे शिकायला मिळाले….

पत्रकारिता करत असलो तर पुणे पोलिस आयुक्तलयात जाण्याची कधी वेळ आली नव्हती. यापूर्वी एक-दोनदाच गेलो असेल. www.policekaka.com या वेबसाईटच्या निमित्ताने पोलिसकाकांसोबत काम करायला मिळणार आहे. यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वेबसाईटबद्दल माहिती देण्याचे ठरवले. त्यांची वेळ घेतली. आज (गुरुवार) सकाळी पोलिस आयुक्तलयातून फोन आला आणि भेटीची वेळ मिळाली.

अमिताभ गुप्ता सरांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. सरांनी स्मित हास्याने त्यांनी स्वागत केले. चेहऱयावरील हास्य पाहून मोठी उर्जा मिळाली. काही वेळातच त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलू लागलो. एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. सरांसोबत पहिली भेट आहे, असे वाटलेच नाही. www.policekaka.com या वेबसाईट संदर्भात माहिती दिली. मी, लिहीलेल्या जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने दिवस) हे पुस्तक त्यांना भेट देताना फोटो काढला. पुढील चर्चेसाठी सरांनी पोलिस अधिकारी श्री. निघूडकर यांच्याशी भेट घडवून दिली. श्री. निघूडकर यांच्या सोबतही विविध विषयांवर चर्चा झाली.

अमिताभ गुप्ता सरांसोबतची आजची भेट नक्कीच ग्रेट भेट ठरली. कामासाठी त्यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा मिळाली.  पुढची भेट लवकरच दुसऱया अधिकाऱयासोबत…. अर्थात पोलिसकाकांसोबत….

(लेखक www.policekaka.com या वेबसाईटचे संपादक आहेत.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!