भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

अहमदाबाद (गुजरात) : सूरत येथील भाजपच्या नेत्या दीपिका पटेल यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूपूर्वी महिला शाखेच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांचे भाजप नगरसेवकाशी १० ते १५ वेळा बोलणे झाले होते. शिवाय, भाजप नगरसेवक दीपिका यांना शोधत त्यांच्या घरी देखील आला होता. दीपिकाला त्यानेच रुग्णालयात दाखल केले. पण, दीपिका यांच्या फोनमधील चॅट्स आणि मेसेज देखील डिलिट केलेले होते. पोलिसांनी दीपिका यांचे दोन मोबाईल फोन जप्त केले, त्यात त्यांना काही फोटो मिळाले. पण अनेक चॅट आणि फोटो त्यात नसल्याचे किंवा डिलिट झाले आहेत. दीपिका यांचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला. याप्रकरणी अल्ठण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

झोन ४ चे पोलिस उपायुक्त विजयसिंह गुर्जर म्हणाले, ‘शवविच्छेदन करण्यात आले आणि तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची पुष्टी झाली. आम्हाला आढळले की ती आर्थिकदृष्ट्या चांगली आहे आणि तिचे पती, मुले आणि सासरे यांच्याशीही तिचे चांगले संबंध आहेत. त्या गृहिणी होत्या पण राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी आयुष्य संपवण्याचं एवढं कठोर पाऊल उचलण्यामागचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.’

रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत पीडितेने सोळंकी यांना १५ वेळा फोन केला. नियमित फोन रेकॉर्डच्या इतिहासावरून असे दिसून येते की ती सोलंकीच्या सतत संपर्कात होती. ते दिवसातून 20 ते 25 वेळा एकमेकांना कॉल करायचे. पोलिसांनी सोळंकी यांची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, दीपिका पटेल (वय 34, रा. अल्ठण वॉर्डातील भीमरड परिसरात राहणाऱ्या आणि तीन मुलांची आई) यांचा रविवारी दुपारी बेडरूममध्ये मृत्यू झाला. त्यांची मुले तिच्या घराच्या खालच्या मजल्यावरील हॉलमध्ये होती तर त्यांचा पती हरेश शेतीच्या कामात व्यस्त होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यूनंतर उडाली खळबळ…

मुंबईत थरार! पोलिसांपासून वाचण्यासाठी 10व्या मजल्यावर लटकला…

EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!