नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…

अंबरनाथ (ठाणे) : नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी उल्हासनगरमधील राहत्या घराच्या टेरेसवरून पत्नीसह आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते, तसा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला होता. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

धनंजय ननावरे यांच्या या व्हिडीओनंतर ठाणे क्राईम ब्रांचने तात्काळ कारवाई सुरू केली असून, उल्हासनगर तसेच अंबरनाथमधून चार ते पाच जणांना अटक केली आहे. ननावरे यांच्या भावाने आपले बोट कापत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओची दखल घेत तातडीने तपासाची चक्रं फिरली आणि खंडणीविरोधी पथकानं शुक्रवारी (ता. 18) काही जणांना अटक केली. यामध्ये शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.

दरम्यान, नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उज्वला ननावरे या दाम्पत्याने दुपारच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उजवला ननावरे यांनी एक व्हिडिओ बनवला होता, हा व्हिडीओ त्यांच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण तसंच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असी मागणीही दाम्पत्याने केली होती.

नंदू ननावरे यांच्या भावाने केलेल्या व्हिडीओत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योग्य तपासाची मागणी केली असून, जोपर्यंत त्यांच्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या शरीराचा एक भाग छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार आहेत, असे म्हणत आहेत. संथ गतीने सुरू असलेला पोलीस तपास जलद गतीने सुरू व्हावा, अशी मागणी देखील बंधू धनंजय ननावरे यांनी केली आहे. धनंजय ननावरे यांनी आपलं एक बोट कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!