पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…
पुणे: बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
बारामती तालुक्यातील रुई येथे मंगळवारी (ता. १६) संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात इंदापूर तालुक्यातील सणसरच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृत युवकाचे नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा होता.
बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी जवळ हा अपघात घडला. आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चार चाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. कार वेगात असल्यामुळे ती एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…
दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…