
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे…
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट २०२३ म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. कधी येईल? काही माहित नाही. पोलिस सांगतात, अहवाल हाती आल्यानंतर तपासाची दिशा ठरवता येईल…
घटनाक्रम…
दिशा हिला २४ ऑगस्ट २०२३ रोजी ताप आला.
१)
आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर):
२५ ते २८ ऑगस्ट दरम्यान पारनेर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल.
२८ ऑगस्ट रोजी आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथून डिस्चार्ज.
२८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिशाला प्रचंड त्रास होऊ लागला.
२)
ओंकार रुग्णालय (सुपा) (जि. अहमदनगर):
२९ ऑगस्ट रोजी सकाळी ओंकार रुग्णालय (सुपा) येथील रुग्णालयात दाखल.
– ओंकार रुग्णालयाने रक्त तपासणी केली
– रक्ताचा अहवाल हाती आल्यानंतर डेंगू झाल्याचे निदान.
– ओंकार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
– दिशा हिची प्रकृती ढासळत चालली होती.
– ओंकार रुग्णालयातील डॉक्टरांची अरेरावीची भाषा
– रुग्णालयाकडे रुग्णवाहिकची व्यवस्था नव्हती.
– नातेवाईकांना तुमची रुग्णवाहिका नको म्हणून सांगण्यात आले
– हॉस्पिटलची रुग्णवाहिका फोन केल्यानंतर तब्बल दीड तासानंतर आली.
– एरवी अर्धा तासात रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचते.
– रुग्णवाहिकेत रुग्णासोबत एक डॉक्टर आणि नातेवाईक
– रुग्णवाहिका पुणे शहराच्या दिशेने निघाली.
– दिशा शिरूर जवळ असताना पोट दुखत असल्याचे सांगू लागली.
– रुग्णवाहिकेमधील डॉक्टरने एक इंजेक्शन दिले.
– डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर दिशा दहा मिनिटानंतर बोलायची बंद झाली ती कायमचीच.
– रुग्णवाहिका केईएम रुग्णालयात संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाली.
– केईएमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
– दिशाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी.
२९ ऑगस्ट रोजी रात्री शवविच्छेदन करण्यात आले.
– मृत्यूबाबत संशय व्यक्त करत व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
३० ऑगस्ट रोजी दिशावर अंत्यसंस्कार.
३)
दिशा हिच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी.
– पोलिस घरी येऊन चौकशी करून गेले.
– शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर पुढील तपास केला जाईल – पोलिस
दिशावरील उपचाराच्या घटनाक्रमातूनच एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, ते सर्व अहवालावर अवलंबून असणार आहेत.
– सर्वसामान्य नागरिक आणि नातेवाईक म्हणून काही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
– अर्थात, अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल.
– दुसरीकडे, तिचे नशीब म्हणून विषय सोडून दिला जाईल.
वैद्यकीय खून समजावा का?
डेंग्यूमुळे एका युवतीचा मृत्यू होणे, हे डॉक्टरांचे मोठे अपयश आहे. २०२३ मध्ये प्रथमच अशी केस पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. डॉक्टरच जर असे म्हणत असतील तर दिशाचा मृत्यू हा वैद्यकीय खून समजावा का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अर्थात, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वच डॉक्टरांबाबत हा नियम लागू होत नाही. कारण, अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांचे जीव वाचवत आहेत, त्यांचे आभार मानवे तेवढे कमीच असतात. पण, काही ठिकाणी वैद्यकीय सेवा हा केवळ व्यवसाय झाला असून, रुग्णांच्या जीवशी खेळले जात असल्याचे अनेक उदाहरणे समोर येताना दिसतात.
शवविच्छेदनाचा अहवाल…
शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवाल ४८ तासात मिळतो. पण, व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्यामुळे अहवाल हाती येण्यास किमान दीड महिना लागतो, असे डॉक्टर सांगतात. शवविच्छेदन अहवाल जो काही येईल तो येईल. पण, २१ वर्षांची युवती चालता-बोलता गेली, त्याचे काय. दिशाची अथवा तिच्या कुटुंबियाची चुक ती काय? उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर सांगतील तसे करत राहिले. अखेर, मृतदेह हाती आला…
महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेची अवस्था काय आहे, ते पुढे येतच आहे. विविध जिल्ह्यांमध्ये रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. अहवाल मागितला जातो. पुढे काय होते, ते कोणालाच कळत नाही. पण, ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर दुःखाचा केवढा डोंगर असतो, हे कोणाला कळणार? कोरोनामध्ये अनेक कुटुंबामधील नागरिकांना जीव गमवावा लागला. त्या कुटुंबियांचे दुःख काय आहे? हे कधी पुढे येत नाही. त्या कुटुंबाला आयुष्यभर दुःखाचा डोंगर उरावर घेऊन जगावे लागते.
दिशा भोईटे हिच्या मृत्यूचा अहवाल हाती आल्यानंतर कारण समजेल. पण, सध्या तरी केईएमचे डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे तिचा मृत्यू म्हणजे वैद्यकीय खून समजावा का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
11/10/2023
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…