नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. […]
अधिक वाचा...Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…
लंडन : एका चिमुकली पालकांची नजर चुकवून रस्त्यावर गेल्यानंतर तीन वाहनांनी तिला धडक दिली. पण, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्येय आला असून, चिमुकली बचावली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @earth.reel या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला […]
अधिक वाचा...भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…
इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक असे मंत्री बनलेल्या महिलेचे नाव आहे. पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. मुशाल मलिकने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, […]
अधिक वाचा...अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
कराची (पाकिस्तान): भारतातून पाकिस्तानमध्ये आलेली अंजू इस्लाम धर्म स्वीकारुन फातीमा झाली आहे. शिवाय, 25 जुलै रोजी मित्र नसरुल्लासोबत लग्न केले आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंजू जोरदार चर्चेत आले. अंजूला 24 तासांत सुमारे 1.25 कोटींचे गिफ्ट मिळाले आहेत. सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्लाचा शनिवारी एक व्हिडिओ समोर आला आहे. दोघे एका रिअल इस्टेट कंपनीच्या सीईओसोबत […]
अधिक वाचा...Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…
कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…
कराची: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये आज (रविवार) जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात झालेल्या बॉम्बस्फोटात ३५ ठार तर 50 हून अधिक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. यावेळी रॅलीत […]
अधिक वाचा...अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…
कराची (पाकिस्तान): भारतीय महिला अंजू हिने धर्मांतर केल्यानंतर नसरुल्लाह याच्याशी निकाह केला आहे. तिचा निकाहनामा व्हायरल झाल्यामुळे या दोघांच्या प्रेम कहाणीची भारत आणि पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन मुलांना सोडून अंजू पाकिस्तानात गेली. त्यानंतर तिने नसरुल्लाहशी निकाह केला आहे. आता या प्रकरणात अंजू आणि नसरुल्लाहकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. नसरुल्लाहने तर अंजूची भारतात […]
अधिक वाचा...अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…
कराची: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (वय ३४) पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. पाकिस्तानमधून तिने एक संदेश धाडला असून, प्रसारमाध्यमांनाही विनंती केली आहे. पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अंजू हिची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजूने देशाची […]
अधिक वाचा...बारमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्याने पेटवला बार; ११ जणांचा मृत्यू…
मेक्सिको: एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. बारमधून बाहेर काढल्याच्या रागातून त्याने बारच पेटवून दिला. या घटनेत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्याच्या सॅन लुइस रिओ कोलोरॅडो शहरात शनिवारी मध्यरात्री जाळपोळ झाल्याची घटना […]
अधिक वाचा...सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिच्याबाबत तिच्या बालमैत्रीणीने गौप्यस्फोट केला आहे. सीमा हैदरला लहानपणापासून ओळखत असून, ती फसवणूक करत आहे. सीमा हैदरच्या मैत्रीणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय युवक सचिन मीना या दोघांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा भारतात पोहोचली आणि […]
अधिक वाचा...
