पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…

कराची (पाकिस्तान): गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील काराकोरम महामार्गावर दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंदपणे गोळीबार केला. यामध्ये 10 जण ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत.

दियामेरचे उपायुक्त आरिफ अहमद म्हणाले की, चिलासच्या हुदूर भागात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली, दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून बस ट्रकला धडकली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

मुख्यमंत्री हाजील गुलबार यांनी घटनेचा निषेध केला आहे. या घटनेची चौकशी सुरु असून तपास करण्यासाठी विशेष पथक बसवले आहे. हल्ल्याविषयी कोणीतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…

पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!