माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…

न्यूयॉर्क: पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असे या भारतीयाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असे पीडित पत्नीचे नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती.

आरोपी मॅथ्यू याने आपली पत्नी मेरिन जॉय (वय २६) हिची कार अडवल्यानंतर तिला 17 वेळा धारदार शस्त्राने भोसकले. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने पत्नीच्या अंगावरुन गाडी घातली होती. केरळच्या कोट्टयाम येथील रहिवासी असणारी जॉय रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. ती रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला होता.

जेव्हा मेरिनचे सहकारी तिला घेऊन रुग्णालयात धावत होते तेव्हा ती फक्त रडत होती. ती वारंवार माझ्या पोटात बाळ आहे असे त्यांना सांगत होती. मेरिन जॉयने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या मारेकऱ्याची ओळख सांगितली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी मॅथ्यूला बेड्या ठोकल्या होत्या. 3 नोव्हेंबरला मॅथ्यूने आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी लावलेल्या आरोपांना आव्हान न देण्याचे ठरवले. यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त त्याला धारदार शस्त्राचा वापर केल्याप्रकरणी 5 वर्षांची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

राज्य अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्या पॉला मॅकमोहन यांनी सांगितले की, ‘जन्मठेपेच्या शिक्षेच्या निश्चिततेमुळे आणि या प्रकरणात अपील न करण्याच्या प्रतिवादीच्या निर्णयामुळे फाशीची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.’ जॉयच्या नातेवाईकांपैकी एकाने सांगितले की, ‘तिच्या आईला हे जाणून आनंद झाला की तिच्या मुलीचा मारेकरी त्याची उर्वरित वर्षे तुरुंगात काढेल. कायदेशीर प्रक्रिया संपली आहे हे जाणून त्यांना दिलासा मिळाला आहे.’

सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! संतपत्तीवरून दोन बहिणींची केली हत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!