महादेव अ‍ॅपच्या Co-founder ला UAE मध्ये अटक…

दुबई : महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अ‍ॅपचा सहसंस्थापक रवि उप्पल याला यूएई मधील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. तो भारतात मोस्ट वांटेड आहे आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणा या यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रवि हा महादेव अ‍ॅप प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याचा सहयोगी आहे.

महादेव बुक अ‍ॅप सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते. भारतात यावर बंदी घालण्यात आली आहे. पण हे इतर देशांमध्ये सुरू आहे. छत्तीसगडचा रहिवासी चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबई हे अ‍ॅप चालवतात. दोघांविरुद्ध लूक आऊट परिपत्रक जारी करण्यात आले होते.

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे या कंपनीचे प्रमोटर्स असून, ही कंपनी कथितरीत्या क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोकर आणि कार्ड गेमसहित अनेक लाइव्ह गेम्समध्ये कथित अवैध सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म पुरवते. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. महादेव ऑनलाइन बुक सट्टेबाजी अ‍ॅप्लिकेशन हे एक प्रमुख सिंडिकेट असून, ते अवैध सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्सना सक्षम करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची व्यवस्था करते.

महादेव बेटिंग अ‍ॅपबाबत ईडीने मोठा दावा केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले की, छाप्यादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी असीम दास याने खुलासा केला आहे की, महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रमोटरने दुबईतून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना कोट्यवधी रुपये पाठवले आहे. यासोबतच छत्तीसगड निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या खर्चासाठीही पैसे पाठवण्यात आले आहेत.

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!