Video: हातामध्ये बंदुका घेऊन थेट चॅनेलच्या स्टुडिओत घुसले अन्…

न्यूयॉर्क: इक्वाडोरमध्ये (लॅटीन अमेरिका) एका टीव्ही चॅनेलच्या थेट प्रक्षेपणादरम्यान13 बंदुकधारी व्यक्ती घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात केली होती.13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी (ता. 9) थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार आहे, अशी माहिती इक्वेडोर सरकारने माहिती दिलीय

इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये 13 दहशतवादी घुसले आणि त्यांनी स्टुडिओतील नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लाईव्ह टीव्हीवर सुरु होता. 13 दहशतवादी तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटकांसह टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. सुरुवातीला स्टुडिओमधील उपस्थितांना काय होतंय हे कळलंच नाही. दहशतवाद्यांनी स्टुडिओमधील उपस्थितांना शांत राहण्यास सांगितले, अन्यथा बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. हा लाईव्ह टीव्हीवर ही सर्व घटना घडली. या सर्व घटनेचे सुमारे 15 मिनिटे थेट प्रक्षेपण सुरु होते.

इक्वाडोर पोलिसांनी सर्व बंदुकधारी व्यक्तींना अटक केली असून, बंदुका आणि स्फोटके जप्त केली आहेत. टीसी टेलिव्हिजनच्या बातम्या प्रमुख, अलिना मॅनरिक यांनी सांगितले की, ‘मास्क घातलेल्या पुरुषांचा एक गट इमारतीत घुसला तेव्हा ती स्टुडिओसमोरील नियंत्रण कक्षात होती. घुसखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्याला जमिनीवर बसण्यास सांगितले. तोपर्यंत घटनेचे थेट प्रक्षेपण केले जात होते, पण सुमारे 15 मिनिटांनी स्टेशनचा सिग्नल कट झाला.’

दरम्यान, इक्वाडोमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. मंगळवारी एकीकडे टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला, तर दुसरीकडे रात्रीच 7 पोलिसांचे अपहरण झाले आहे, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपतींनी तुरुंगांवर लष्कराने पहारा ठेवण्याचे आदेश दिले. याशिवाय देशात कार्यरत असलेल्या 20 अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात यावे, असा आदेश जारी करण्यात आला होता.

माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!