
प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
न्यू यॉर्क: अभिनेता ख्रिश्चियन ओलिवर (वय ५१) याच्यासह त्याच्या दोन लहान मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे लहान विमान कॅरेबियन बेटाजवळ समुद्रात कोसळले. त्यांच्यासोबत विमानाचा मालक आणि पायलट असलेल्या रॉबर्ट सॅक्स यांचाही मृत्यू झाला आहे.
सिंगल इंजिनच्या विमानाने गुरुवारी दुपारी बेक्वियातील विमानतळावरून उड्डाण केले होते. कॅरेबियन देश सेंट विसेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या भागातून ते सेंट लुसियाकडे निघाले होते. त्यावेळी विमानाचा अपघात झाला. ओलिवर यांच्या मुली मदिता क्लेप्सर आणि एनिक क्लेप्सर यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
रॉयल सेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलीस फोर्सने म्हटले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला आणि विमान समुद्रात कोसळले. पगेट फार्मच्या मच्छिमारांनी आणि पाणबुड्यांच्या मदतीने घटनस्थळी बचावकार्य राबवण्यात आले. पण सर्वांचा मृत्यू झाला होता. विमान दुर्घटनेची चौकशी केली जात आहे. पायलटने उड्डाणानंतर तात्काळ टॉवरवर रेडिओ मेसेज पाठवला होता. विमान उड्डाणात अडचणी असून, विमान उतरवत असल्याचे शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले होते.
जर्मनीत जन्मलेल्या ओलिवरने द गुड जर्मनमध्ये केंट ब्लँचेट आणि जॉर्ज क्लूनी, स्टीव्हन सोडरबर्ग यांच्यासोबत काम केले होते. वाल्किरीमध्ये ब्रायन सिंगर आणि टॉम क्रूज यांच्यासोबत तर वाचोव्स्कीच्या स्पीड रेसरमध्येही काम केले होते. स्पीड रेसर, वाल्किरी यांसह विविध चित्रपटांमधील भूमिकांमुळे ते चर्चेत आले होते.
भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…
Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

