
बिर्याणीनंतर रात्री कलिंगड खाल्लं अन् कुटुंबातील चौघांचा मृत्यू…
मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात वास्तव्यास असलेल्या डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबाने शनिवारी रात्री बिर्याणी खाण्याचा बेत आखला होता. चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावण्यात आले. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनीही त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमागे विषबाधेचं कारण असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. शेजारी डोकाडिया कुटुंबीयांच्या घरात पोहोचले तेव्हा चौघेजण बेशुद्ध पडले होते. त्यांनी संपूर्ण घरात उलटी केली होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना बोलावून घेतले. त्यांनी सर्वांना सीपीआर ट्रिटमेंट दिली. यानंतर लहान मुलीला साबु सिद्दिकी रुग्णालयात नेले तर तिच्या आई-वडिलांना जे.जे. रुग्णालयात नेले. त्याठिकाणी नवऱ्याचा रक्तदाब कमी झाला, मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान नवरा बायको आणि मुलींचा मृत्यू झाला, असे डॉ. कुरेशी यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

