
इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक…
इस्लामाबाद : इराणने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. बलुचिस्तानमधील पंजगुरमध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. पाकिस्ताने इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
भारताप्रमाणेच इराणनेही एअरस्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. बलूचिस्तानातील पंजगुरमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर इरानने म्हटलंय की, त्यांनी दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला. सुरुवातीला पाकिस्तानाकडून या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र नंतर पाकिस्तानने इराणला इशारा दिला. या हल्ल्याचे परिणाम वाईट होतील असे पाकिस्तानने म्हटले आहे. इराणने या हल्ल्यामध्ये दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे. मात्र पाकिस्तानने हल्ल्यामध्ये दोन लहान मुले मारली गेल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानात मंगळवारी बलूची दहशतवादी समूह जैश अल अदलच्या दोन ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला. इराणच्या सरकारी मीडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स द्वारे इराक आणि सीरियामध्ये मिसाइल हल्ल्याच्या एक दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या मीडियाने सविस्तर माहिती देत म्हटले की, ‘मिसाइल आणि ड्रोनने हल्ला करण्यात आला आणि त्यांना नष्ट करण्यात आले. हा हल्ला त्यांच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानात सुन्नी बलूच दहशतवादी समूह जैश अल-अदलवर मिसाइल आणि ड्रोनने केला आहे. इराणने पाकिस्तानात जैश अल अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या दहशतवादी समूहाने पाकिस्तानातील सीमावर्ती भागांमध्ये असलेल्या इराणच्या सुरक्षादलांवर हल्ला केला होता.’
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…
पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…
पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…
पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

