
दाऊद इब्राहिम याची प्रकृती चिंताजनक; लाइट गायब अन् इंटरनेट ठप्प…
कराची (पाकिस्तान): मुंबईत झालेल्या बॉम्बस्फॉटाचा मास्टरमाइंड दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद याची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. दुसरीकडे संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील डाउन करण्यात आले आहेत. पाकिस्तानात इंटरनेट आणि सोशल मीडिया डाऊन केल्यामुळे युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानमधील इंटरनेटसेवा ठप्प झाल्याने युजर्सना त्रास सहन करावा लागला. इंटरनेट ठप्प होण्यामागे कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाची व्हर्च्युअल सभा असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ(पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांची रविवारी (ता. १७) रात्री व्हर्चुअल रॅली होती. त्यामुळे वातावरण बिघडू नये या रॅलीच्या आधीच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेकजण दाऊद इब्राहिम याच्या प्रकृतीबाबत धागा जोडून पाहत आहेत. सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमबाबत अफवा पसरवण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणीही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
दाऊद इब्राहिमवर कराची येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेही म्हटले जात आहे. दाऊन इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्यास आहे. तिथेच त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम आयएसआयच्या कडेकोट सुरक्षेत असतो. त्याच्यापर्यंत सामान्य माणूसही पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जाते आहे. तसेच, दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता.
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…
पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…
पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…
पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

