
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बाबत नेमकं खरं काय? खोटं काय?
कराची (पाकिस्तान): भाई 1000 टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूनं पसरवल्या जात आहेत, असा दावा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक छोटा शकील याने केला आहे.
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून तो कराचीमधील रुग्णालयात दाखल आहे, असे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. नेमकं खरं काय? खोटं काय? याचा शोध जगभरातील एजन्सीकडून घेतला जात आहे. दुसरीकडे दाऊद अगदी ठणठणीत असून त्याला काहीच झालेले नाही, त्याच्या मृत्यूच्या बातम्याही अगदी खोट्या असल्याचा दावा समोर आला आहे.
एका पाकिस्तानी पत्रकाराने सोशल मीडियावर सांगितलं की, दाऊदची पाकिस्तानातील कराचीमध्ये भरती करण्यात आली आहे, परंतु या दाव्यांमागील सत्य कोणालाही माहिती नाही. पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दाऊदबद्दल काहीच माहिती दिलेलं नाही. पाकिस्तानातील काही वृत्तपत्रंही सोशल मीडियाच्याच हवाल्याने बातम्या देत होते. दरम्यान, दाऊद पूर्णपणे बरा असून त्याला काहीही झालं नसल्याचं समोर आले आहे.
दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकील याने त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा आणि रुग्णालयात दाखल झाल्याचा इन्कार केला आहे. भाई 1000 टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूने पसरवल्या जात असल्याचेही त्यांने सांगितले आहे. दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.
दरम्यान, दाऊद इब्राहिम याचे खरं नाव शेख दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्यांचे वडील शेख इब्राहिम अली कासकर हे मुंबई पोलिसांत हवालदार होते. आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी त्याला शिक्षण सोडायला लावले होते. यानंतर दाऊद गुन्हेगारीच्या जगात आला. आधी त्याने तत्कालीन डॉन हाजी मस्तानसोबत काम केले आणि नंतर त्याच्यापासून वेगळं होऊन दुबईतून काम करायला सुरुवात केली. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात असल्याचे बोलले जात आहे. एस. हुसैन झैदी यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड एक, नाम आनेक’ या पुस्तकात दाऊदची 13 नावं असल्याचा दावा करण्यात आला होता.
दाऊद इब्राहिम याची प्रकृती चिंताजनक; लाइट गायब अन् इंटरनेट ठप्प…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

