ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय राऊत यांची ‘म्हाडा’च्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती…
पुणे (संदिप कद्रे) : महर्षीनगर (गुलटेकडी) येथील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय वैजीनाथ राऊत यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागावर कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऍड. राऊत हे गेल्या ३० वर्षांपासून विधी क्षेत्रात कार्यरत असून, मागील १९ वर्षांपासून ते भारत सरकारचे ‘नोटरी’ म्हणूनही सेवा देत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून […]
अधिक वाचा...पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…
पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक महिला वकील (वय ४२) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. […]
अधिक वाचा...सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…
सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका युवा वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असे चिठ्ठीत लिहिले आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली […]
अधिक वाचा...Live Video: वकीलाने सुनावणीवेळी महिलेला केलं Kiss…
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कामकाजाआधी एका वकिलाचा लाईव्ह रोमान्स कॅमेरामध्ये कैद झाला आहे. वकील कॅमेरा सुरू असतानाच महिलेचे चुंबन घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका खटल्याच्या ऑनलाईन सुनावणीवेळी ही घटना घडली आहे. न्यायाधीश सुनावणीसाठी दाखल झाले नसल्यामुळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. आपला व्हिडिओ सुरू असल्याचे वकिलाच्या लक्षात नव्हते. […]
अधिक वाचा...बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…
बीड: वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चंदेल कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ‘व्ही.एल. चंदेल यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत […]
अधिक वाचा...बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
बीड: बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार […]
अधिक वाचा...स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी (ता. २८) कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पीडित युवती (वय २६) आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक […]
अधिक वाचा...मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ॲड. अक्षय नाईक, ॲड. देवेंद्र चव्हाण, ॲड. मोहन सुदामे व ॲड. फिरदौस मिर्झा आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला आहे. वरिष्ठ वकीलाचा दर्जा १८ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...Video: आंतरराष्ट्रीय खटले गाजवणारे हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर…
नवी दिल्लीः देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे (वय ६८) तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये हरिश साळवे यांनी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली होती. हरीश साळवे यांनी नुकतेच त्रिना (मूळ रा. ब्रिटन) यांच्यासोबत थाटामाटात लग्न केले आहे. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. साळवे […]
अधिक वाचा...
