
पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे.
वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास वेळीच अटकाव करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचे मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक श्री मनोज साळुंखे, पोलिस अंमलदार विजय खिलारी, किरण तळेकर यांनी अभ्यासपूर्ण असा प्रस्ताव तयार करुन त्याचेवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त यांना प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

पोलिस आयुक्त यांच्याकडून २७/०३/२०२६ रोजी MPDA आदेश प्राप्त होताच आरोपी सिध्दार्थ गवळी यास तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उप
निरीक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ यांनी अंत्यत चतुराईने ताब्यात घेवुन त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, सुजाता तानवडे, सहा. पोलिस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे सुचनेनुसार व महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस ठाणे, श्री. प्रकाश धेंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे, पोलिस अंमलदार विजय खिलारी, बालाजी काटे, किरण तळेकर, निखील तांगडे, योगेश वाघ यांनी केलेली आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…
पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…
पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन आवळल्या ३६ जणांच्या मुसक्या…
पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…

