
संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…
मुंबई : सावत्र बापाने दोन वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना संतापजनक घटना मानखुर्द येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. नराधम बापाने दोन वर्षीय चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं आणि त्यानंतर चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली आहे.
चिमुकलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर चिमुकलीसह ती आरोपीसोबत राहत होती. चिमुकली मुलगी आपल्या नात्यात अडथळा ठऱत असल्याची भावना आरोपीच्या मनात होती. त्यावरून आरोपीचे आणि चिमुकलीच्या आईचे वादही होत होते. याचाच राग आरोपी चिमुकल्या मुलीवर काढत होता.
मुलीची आई शुक्रवारी (ता. ८) दुपारी नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेली. पतीसोबत चिमुकली घरातच होती. जेव्हा चिमुकलीची आई घरी परतली तेव्हा तिला मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची दिसली. आईने मुलीला तातडीने रुग्णालयात नेले पण तिथे डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितले. या घटनेने मुलीच्या आईला मोठा धक्का बसला.
चिमुकलीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. शिवाय, तिचा गळा आवळल्याचे व्रणही होते. तिच्या प्रायव्हेट पार्टला जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्तस्राव होत होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अत्याचाराची कबुली दिली. आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…
संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

