भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…

जयपूर (राजस्थान): आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त झालेल्या भाविकांच्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

राजस्थानच्या भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसची धडक झाली. बस राजस्थानच्या पुष्करमधून उत्तर प्रदेशातील वृंदावनला जात होती. एका पुलावर बस नादुरुस्त झाली तेव्हा हा अपघात झाला. बसमधून ४५ जण प्रवास करत होते. लखनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर हंताराजवळ आज (बुधवार) सकाळी साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये ६ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत हे गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

भावनगरहून मथुरामार्गे हरिद्वारला बस निघाली होती. भरतपूर आग्रा महामार्गावर बस अचानक नादुरुस्त झाली. चालकासह इतर प्रवासी बसमधून खाली उतरले होते. बस दुरुस्त केली जात असतानाच महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. यावेळी रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या भाविकांना ट्रकने चिरडले. यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी भरतपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी सुरळीत केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…

नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!