पत्नीने नवऱ्याला त्याच्या मित्रासमोरच मारले अन् पुढे नको ते घडले…

अमरावती : पतीने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढल्यामुळे पत्नी चिडली आणि पत्नीने पतीच्या मित्रासमोरच पतीला अपमानित केले होते. नवऱ्याच्या भावना दुखावल्या आणि त्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकलविहीर येथे पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. आरोपी शालीकराम धुर्वे हा गावातील गुरे चारण्याचे काम करतो. त्यातून मिळणारे […]

अधिक वाचा...

अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…

अमरावती : अमरावतीमधील पशुधन विकास अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये घडली आहे. चेतन सोळंके असे आरोपीचे नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती […]

अधिक वाचा...

अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…

अमरवती : अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली असून, वडील थोडक्यात बचावले आहे. ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर परिसरात सोमवारी (ता. २९) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटना स्थळाला भेट दिली. यावेळी परिसरात […]

अधिक वाचा...

अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…

अमरावती : एका कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. भातकुली गावाच्या परिसरात कारचे टायर फुटल्यानंतर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

अमरावती : अमरावतीमध्ये एका आईनेच आपल्या १२ वर्षाच्या मुलाला विष दिल्यानंतर स्वतःही विष घेतले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातील हमालपुरा येथे घडली. योगिता गजानन वाघाडे (वय 34, रा. हमालपुरा) आणि अथर्व गजानन वाघाडे (वय 12) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. […]

अधिक वाचा...

अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…

अमरावती: अमरावती शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलिस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा डावा पाय निकामी झाला आहे. अपघात इतका भयानक होता […]

अधिक वाचा...

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

अमरावती : दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. प्रियंका शिरसाट असे मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड […]

अधिक वाचा...

संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

अमरावती: महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्त्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!