अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…

अमरावती : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने (वय १९) इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर युवती आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडीओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपीने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्याचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे 180 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच 350 हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात SIT चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी युवकाने कुटुंबासह परतवाडा सोडल्याची माहिती समोर येत असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडित महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!