अब्जाधीश सासऱ्याला संपवण्यासाठी ५ महिन्यांपासून कट, प्लॅन ‘ए’ फसला, प्लॅन ‘बी’ अयशस्वी; अखेर प्लॅन ‘सी’ नुसार…

कानपूरः उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका अब्जाधीश औषध व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींनी अखेर तोंड उघडले. त्यांनी या प्रकरणी अनेक थरारक खुलासे केले आहेत. व्यापाऱ्याच्या सुनेने आपल्याच सासऱ्यांना संपवण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३ प्लॅन आखले होते. प्लॅन ए हा घराबाहेरचा होता. त्यामुळे तो अमलात आणण्याचा सर्वात जास्त धोका सुपारी किलरला होता. त्यामुळे त्यांनी त्यास नकार […]

अधिक वाचा...

कुख्यात अबू सालेमला ‘सर्वोच्च’ दणका; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुदतपूर्व सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

नवी दिल्लीः १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमची २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर सुटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणताना २५ वर्षांपेक्षा अधिक कारावास न देण्याचे भारत सरकारने आश्वासन दिले होते. अंडरट्रायल काळ, दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि […]

अधिक वाचा...

सूनेचे नोकरासोबत चॅटिंग प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील कोट्यधीश औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी सून शालू मिनोचा (वय ३०) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सून शालू मिनोचा हिने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. विनीत मिनोचा यांची हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सासरे विनीत मिनोचा प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे आणि मुला-सुनेच्या खर्चावर […]

अधिक वाचा...

अमृतसर विमानतळाजवळ संशयास्पद ड्रोन्सच्या घिरट्या; सात विमानांचा मार्ग बदलून दिल्लीकडे वळविली…

अमृतसर: अमृतसर येथील श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी परिसरात रविवारी रात्री एकाच वेळी अनेक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना आढळल्याने खळबळ उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे १ तास ३० मिनिटे विमानतळावरील सर्व उड्डाणे ताबडतोब थांबवण्यात आली. दोन आंतरराष्ट्रीय विमानांसह एकूण ७ विमानांचा मार्ग बदलून ती दिल्ली विमानतळाकडे वळविण्यात आली. विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री […]

अधिक वाचा...

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून बेदम मारहाणीत मणिपुरी संगीतकाराची दिल्लीत हत्या…

नवी दिल्ली: दिल्लीतील सनलाइट कॉलनीच्या आश्रम परिसरात रविवारी (ता. ६) रात्री गोंधळाला विरोध केल्याने मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंह (वय ५५) यांच्यावर आठ जणांनी हल्ला केला. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या सिंह यांनी, ढाब्याबाहेर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना विरोध केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या जिन्याच्या लॉबीमध्ये त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर […]

अधिक वाचा...

बेपत्ता मुलगा मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, ‘तो जिवंत आहे’…

कपुरथळाः मुलगा घरातून बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला. काही दिवसांतच पोलिसांना एक बेवारस जळालेला मृतदेह सापडला. त्यांनी ओळख पटविण्यासाठी बेपत्ता मुलाच्या कुटुंबीयांना पाचारण केले. हा आपला मुलगा रवी कुमारच आहे, अशी कुटुंबीयांनी ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर रीतसर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मुलगा गेल्याच्या दुःखतून […]

अधिक वाचा...

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अन्…

मुझफ्फरनगरः कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १४) रस्त्यातून अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तीन तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका घरात नेले आणि त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू […]

अधिक वाचा...

दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; त्यापैकी सहा मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या. त्यापैकी एका सहा मजली इमारतीमध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. अपघात झाला, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्येच होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती विद्यार्थी अडकले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षेसाठी जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही […]

अधिक वाचा...

एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या १,३२२ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी सीबीआयतर्फे सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा…

मुंबईः केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून घेतलेल्या १,३२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जांमधील कथित अनियमिततेप्रकरणी एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या तक्रारीनंतर ३१ ऑगस्टला हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रा यांनी कर्जदार कंपन्या आणि त्यांच्या संचालकांसह आर्थिक मदत मिळवण्यासाठी निव्वळ मालमत्तेचा […]

अधिक वाचा...

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू…

मुंबई: ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचा वापर भारतात हेरगिरीसाठी भावी ‘एजंट’ बनवण्यासाठी पाकिस्तानातील ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेच्या हालचाली चालू असल्याचे भयानक कटकारस्थान उघडकीस आले आहे. सैन्यात दाखल होण्यापूर्वीच भावी हेरगिरीसाठी लागणारे ‘गुणवान’ उमेदवार शोधण्याचे व्यासपीठ म्हणून, अग्निवीर भरती प्रक्रियेवर पाकने लक्ष केंद्रित केल्याचे भारतीय तपास अधिकाऱ्यांना आढळले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!