संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…

लखनौ (उत्तर प्रदेश) : हमीरपूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलीला गंभीर अवस्थेत ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अंगणात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या चुलत्याने (वय ३०) बलात्कार केला. यामुळे मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई घटनास्थळी पोहोचली तेव्हा आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईने मुस्करा पोलिस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उरई मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी चुलतीला पकडून त्याची चौकशी सुरू केली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. दीक्षा शर्मा यांनी सांगितले की, ‘पीडित मुलीला प्राथमिक उपचारानंतर उरई येथे दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.’

दरम्यान, आरोपीनी रक्ताने माखलेली पॅन्ट जंगलात लपवून ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला जंगलात नेले. तिथे त्याने आधी लपवलेल्या पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात आरोपीच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!