उज्जैनच्या शाही मशिदीवर बुलडोझर कारवाईपूर्वी जमावाची दगडफेक; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या…

उज्जैनः मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शाही मशिदीवरील बुलडोझर कारवाईपूर्वी गोंधळ उडाला. मशिदीजवळ मोठा जमाव जमला आणि पोलिसांशी त्यांची झटापट झाली. आंदोलनादरम्यान पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडल्या. उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. या प्रकल्पासाठी शाही मशिदीचा काही भाग पाडण्याचे नियोजन आहे. हा भाग पाडण्यासाठी आलेल्या पथकावर समाजकंटकांनी हल्ला […]

अधिक वाचा...

गुजरातमध्ये १८७० कोटी रुपयांच्या बनावट राजकीय देणग्या उघडकीस; पोलिसांनी दाखल केला एफआयआर…

अहमदाबाद: गुजरात पोलिसांनी राज्यातील तीन अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांविरुद्ध तीन स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर अंदाजे १,८७० कोटी रुपयांच्या फसव्या राजकीय देणग्यांच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे सुमारे ५६० कोटी रुपयांचे थेट महसुली नुकसान केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीवरून कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे. गांधीनगर येथील सीआयडी (गुन्हे) झोनने भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, […]

अधिक वाचा...

शिंपी असल्याची बतावणी करणाऱ्या खुन्याला अखेर २४ वर्षांनंतर गुरुग्राममध्ये अटक…

नवी दिल्ली: तब्बल २४ वर्षांपूर्वी एका अंध व्यक्तीचा खून करून फरारी झालेल्या फिरोझ ऊर्फ ख्वाजा याला पोलिसांनी गुरुग्राममध्ये अटक केली आहे. २४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीने शिंपी असल्याची बतावणी करत, गुरुग्राममध्ये आपले बस्तान बसविले होते. आयएमटी मानेसर येथील एका तयार कपड्यांच्या कारखान्यात शिंपी म्हणून काम करत होता. जुन्या वैमनस्यातून आणि सूडापोटी त्याने हा […]

अधिक वाचा...

कानांतील इअरबड्समुळे हातकणंगल्यात ट्रेनच्या धडकेने युवती मृ्त्यूमुखी…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एका भीषण अपघातात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रेल्वे रुळांजवळून दोन मैत्रिणींसोबत चालत जात असताना धनबाद एक्सप्रेसने तिला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ती सुमारे ३० फूट हवेत फेकली गेली आणि दूरवर जाऊन पडली. तिला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीची ओळख इचलकरंजी […]

अधिक वाचा...

दिशा सालियनचे वडील सीबीआयकडे ‘पुरावे’ सादर करणार, आरोपीला तत्काळ अटक करण्याची त्याच्या वकिलांची मागणी…

मुंबई: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी, तिचे वडील सतीश सालियन, गुरुवारी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या कार्यालयात एक पेनड्राइव्ह सुपूर्द करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत वकील निलेश ओझा असतील. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे आहेत. या प्रकरणात नाव असलेल्यांवर सीबीआयने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. […]

अधिक वाचा...

पर्यवेक्षिका मनीषा झा ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना झाली कॅमेऱ्यात कैद…

निवारीः मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी प्रशासक मनीषा झा यांचा नोटा मोजतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागात खळबळ उडाली आणि अंगणवाडी सेविका भरतीमधील भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. व्हीडिओ समोर आल्यानंतर, विभाग आणि प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे. मनीषा झा यांच्याशी […]

अधिक वाचा...

तुम्हाला मरायचे असेल तर मरा, बस थांबणार नाही; बस चालकाच्या अरेरावीनंतर बसमधील ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

नोएडा: उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गावर बसला आग लागल्याच्या घटनेत प्रवाशांनी चालक आणि वाहकावर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. प्रवासी सुनील कुमार यांच्या तक्रारीनुसार, काही प्रवाशांनी बसच्या चालकाच्या केबिनमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याची तक्रार चालक आणि वाहकाला दिली होती. आगीत अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले. त्यांना उपचारासाठी जेवर येथील कैलास रुग्णालयात नेण्यात आले. सुनीलच्या […]

अधिक वाचा...

दिल्लीतील सरिता विहारमध्ये भरधाव डंपरच्या भीषण अपघातात एचआर मॅनेजर आणि इतर तिघांचा मृत्यू…

नवी दिल्ली: दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने उभ्या असलेल्या क्रेन आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्ग ते पुण्यापर्यंत ६ तास पाठलाग करून १.१३ कोटींचा गुटखा एफडीएकडून जप्त…

मुंबई: समृद्धी महामार्गापासून पुण्यापर्यंत चाललेल्या सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी चाकण-तळेगाव चौकात एका ट्रक अडवून १.१३ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एफडीएच्या पथकांनी मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टाटा ट्रकचा पाठलाग सुरू केला. हा […]

अधिक वाचा...

केरळच्या नौदल अकादमीत बनावट ओळखपत्रावर काम करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला अटक…

तिरुवनंतपुरम: केरळच्या अत्यंत संवेदनशील एझिमला नौदल अकादमीमध्ये काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथे काम करत होता. बिप्लब सोरेन (वय ३२) असे नाव धारण करणारी ही बांगलादेशी व्यक्ती, आपले बांगलादेशी नागरिकत्व लपवून नौदल अकादमीच्या लाँड्री विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!