
सूनेचे नोकरासोबत चॅटिंग प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील कोट्यधीश औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी सून शालू मिनोचा (वय ३०) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सून शालू मिनोचा हिने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. विनीत मिनोचा यांची हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
सासरे विनीत मिनोचा प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे आणि मुला-सुनेच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवून त्यांना अगदी मोजकेच पैसे देत होते. पैशांवर बंधनं असल्यामुळे आणि खासगी आयुष्यात सतत हस्तक्षेप होत असल्याने सून शालू नाराज होती. त्यामुळे सासऱ्याचा काटा काढण्यासाठी शालू हिने सहा लाख रुपयांत कॉन्ट्रैक्ट किलर्सशी (माजी नोकर विशाल व त्याचा साथीदार राजकिशोर) कट रचला होता. विनीत मिनोचा यांना सुरुवातीला उशीने तोंड दाबून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचायचा होता, पण नंतर आरोपींनी चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
View this post on Instagram
सासऱ्याच्या हत्येनंतर सून ढसाढसा रडत नाटक करत होती, परंतु सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा रक्षकाचा जबाब आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे 21 दिवसांत 330 हून अधिक कॉल झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा पर्दाफाश झाला.
विनीत मिनोचा हे 5 सप्टेंबर 2026 रोजी रात्री कानपूरच्या कल्याणपूर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये चाकूने 26 वेळा भोसकलेल्या अवस्थेत आढळले. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या विश्लेषणातून तिचा सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची सून, शालू मिनोचा हिला अटक केली. शालूने ही हत्या करण्यासाठी विशाल गौतम नावाच्या एका माजी घरकामगाराला 6 लाख रुपये दिले होते. तिने हल्लेखोरांसाठी घराची दुसरी चावीसुद्धा तयार ठेवली होती.
पोलिसांच्या अहवालानुसार, शालूला तिच्या सासऱ्यांचे कौटुंबिक आर्थिक व्यवहारांवर, दैनंदिन हालचालींवर असलेले कडक नियंत्रण आणि कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे खटकत होते. शालू, विशाल गौतम आणि राज किशोर नावाच्या त्यांच्या एका साथीदाराला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…
सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण…
दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…
सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

