
प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा…
वर्धा: वर्धा शहरात आयोजित केलेल्या प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान तुफान राडा झाला. मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरील डान्स नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
काही प्रेक्षक एकमेकांच्या दिशेने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकत होते. जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर आयोजकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी कसरत करावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना देखील हस्तक्षेप करावा लागला. गोंधळ जास्त वाढल्यामुळे अखेर गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम काही वेळासाठी बंद करण्यात आला. गोंधळ शांत करण्यासाठी आयोजकांकडून बाउन्सर प्रेक्षकांच्या गर्दीत उतरले. मात्र, बाउन्सर आणि प्रेक्षक यांच्यात मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आणि त्यामुळे हा राडा अधिकच वाढला.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला, मात्र या घटनेमुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांच्या आयोजनातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय…
गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…
गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

