पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पिस्टलसह केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर कारवाई केली असून, देशी पिस्टलसह त्याला जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार पर्वती पोलिस ठाणेचे तपास पथक पर्वती पोलिस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंगलदार कुंदन शिंदे, व पुरुषोत्तम गुन्ला यांना बातमी मिळाली की, ‘पर्वती पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी साहिल पटेल याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो शाहु वसाहत, लक्ष्मीनगर येथे शंकर गणपती मंदीर सार्वजनिक शैचालयाचे बोळीत येथे संशयास्पदरित्या थांबलेला आहे.’
पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलिस निरिक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांना कळवून त्यांचे आदेशाने पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन सोबतचे स्टाफचे मदतीने सापळा रचुन सदरचे इसमास पकडले. त्याचे नाव साहिल हनिफ पटेल (वय २१ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर गजानन महाराज मठासमोर, पुणे) असे असुन त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस ३५,७००/-रू किमंतीचे व जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द दत्तवाडी पो. स्टे. येथे गु.र.नं. २७८/२०२३, भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५), मुंबई पोलिस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा पर्वती व बिबवेवाडी पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्नीशस्त्र / धारदार शस्त्रे बाळगणे, जबरी चोरी, चोरी, दंगा इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे यापुर्वी दाखल असुन त्याने सदरचे पिस्टल कशासाठी व कोणाकडुन आणले होते. तसेच त्याचा यापुर्वी कोठे वापर केला अगर कसे व त्याचे अन्य साथीदार कोण आहेत याचा पर्वती पोलिस वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करीत आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविण पाटील, पोलिस उप-आयुक्त सो परि. ३ सुहैल शर्मा, सहा. पोलिस आयुक्त सिंहगड विभाग अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे पो. हवा. कुंदन शिंदे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले, सद्दाम शेख व ज्ञानेश्वर चिंदे यांनी केली आहे.
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…
पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…