हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पुणे : विहिरीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत घडली आहे. स्वप्नील राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शुक्रवारी (ता. ३) रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपल्यावर स्वप्नीलने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळींनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे विहिरीशेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिले असता स्वप्नीलने स्वत: विहिरीत उडी मारल्याचे आढळले.

स्वप्नीलचे वडील, भाऊ शेजारच्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. तर स्वप्नील हा हिंजवडी येथील येथे एका कंपनीमध्ये कामाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याला मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे होत होती. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!