
मायावती यांच्या भाचीचा आरोप; नवऱ्याने पौरुषत्व गमावल्यानंतर दीरासोबत शरीरसंबंध ठेव म्हणाले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भाचीने पतीसह सासरच्या सात जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हापुड कोतवालीतील मायावतींची भाची एलिस हिचा पती, सासू, सासरे, मोठे दीर, जाऊ, नणंद आणि आत्तेसासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलिसच्या सासूबाई असलेली आरोपी महिला हापुड नगरपालिकेची अध्यक्षा आहे.
बसपा प्रमुख मायावती यांच्या भाचीचा विवाह 9 नोव्हेंबर 2023 रोजी हापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा देवी यांचा मुलगा विशाल सिंग यांच्याशी झाला. लग्नानंतर, सासरच्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून बहुजन समाज पक्षाचे तिकीट, 50 लाख रुपये रोख आणि गाझियाबादमध्ये फ्लॅटची मागणी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला आहे.
पीडितेने आरोप केला आहे की, तिचा पती बॉडी बिल्डिंगसाठी स्टिरॉइड्स वापरतो. पती विशाल लग्नाआधीपासूनच स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन मसल्स बनवत होता, त्यामुळे तो नपुंसक झाला आहे. हे सत्य सासरच्या लोकांना आधीपासूनच माहीत होते. तरीही त्यांनी लग्न करून दिले. जेव्हा तिने यावर प्रश्न विचारला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला गप्प राहण्यास सांगितले. एलिसने याबद्दल तिची सासू आणि नणंद यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्या एलिसला म्हणाल्या, ‘जर मूल पाहिजे असेल, तर मोठ्या दिराकडून करून घे, असे म्हणाले.’
17 फेब्रुवारी 2025 च्या रात्री एलिससोबत एक भयानक घटना घडली. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबानुसार, 17 फेब्रुवारीच्या रात्री तिच्या सासऱ्याने आणि दीराने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जर त्याची हुंडा मागणी पूर्ण झाली नाही तर त्याने तिची बदनामी करण्याची धमकीही तिला दिली. या घटनेनंतर एलिस तिच्या पालकांच्या घरी पोहोचली आणि पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. सासरच्यांच्या राजकीय प्रभावामुळे कोणतीही कारवाई झाली नाही, असा तिचा आरोप आहे. 21 मार्च रोजीही हापुड एसपींना नोंदणीकृत पोस्टाने तक्रार पाठवण्यात आली होती, परंतु तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 24 मार्च रोजी पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर, 10 एप्रिल रोजी हापूर नगर कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मायावती यांच्या कुटुंबामध्ये एकूण नऊ भाऊ-बहीण आहेत. एलिस ही नरेश कुमार यांची मुलगी आहे. तिचे लग्न 9 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हिंदू रितीनुसार विशाल सिंहसोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले, पण नंतर पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली, तिला मारहाण आणि धमक्या दिल्या असा आरोप आहे.
सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…
चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…
धक्कादायक! व्यावसायिकाला शारिरीक संबंधासाठी सख्ख्या बहिणींनी घरी बोलावले अन्…
सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…

