पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

कराड (सातारा): पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून चारचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पोलिस कर्मचारी भाऊ-बहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नितीन पवार (रा. कोल्हापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) अशी इतर दोन मृतांची नावे आहेत. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

कोल्हापूरहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर उभे असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून चारचाकी गाडीने जोरात दिली. या धडकेमध्ये चारचाकीचा चक्काचूर झाला. मोटारीमधील तिघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अपघातात ट्रकला चारचाकी वॅगनार गाडीने धडक दिली.

पोलिस कर्चमचारी नितीन पवार हे आपल्या बहीण आणि भाच्याला सोडण्यासाठी जात असताना त्यांच्या वॅगनार मोटारीला झाला. कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयकुमार उथळे, दस्तगीर आगा यांच्यासह वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक मोकळी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!