महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…
जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. सीमा बंजारा (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स मिळवून आरोपीचा शोध घेतला. यानंतर पोलिसांनी शोएब मोहम्मद सिलावट (वय २४) या आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, दागिने लुटण्यासाठी त्याने महिलेची हत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे हे दागिने सोन्याचे नव्हते तर आर्टिफिशियल होते, हे या आरोपीला माहिती नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवून भिलवाडा शहरातील प्रियदर्शनी नगर येथील हाऊसिंग बोर्डाच्या पडझड झालेल्या इमारतीत घेऊन गेला होता. दोघांनी एकत्र बसून दारू प्यायली. महिलेने गळ्यात आणि कानात कृत्रिम दागिने घातले होते, हे दागिने सोन्याचे असल्याचा आरोपीचा समज झाला. त्याने हे दागिने लुटण्याचे ठरवले. यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरून दागिने लुटून घटनास्थळावरून पळ काढला होता. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…
महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…
धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…
महिला युवकांना फोन करून गोड-गोड बोलून हॉटेलवर बोलवायची अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!