‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाचे पास अन् लाखो रुपयांची फसवणूक…

मुंबईः ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शहा हा स्वस्तात पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका युवकाला मिळाली होती. शहा याच्याकडून या कार्यक्रमाचा पास 4,500 रुपयांऐवजी 3,300 रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार युवक व त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी तयार झाले.

तक्रारदारासह 156 जण पास खरेदी करण्यास तयार झाले. त्यानुसार तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा केली. त्याबाबतची माहिती शहा याला देण्यात आली होती. त्यानुसार शहाने तिघांना न्यू लिंक रोड, बोरिवली (पश्चिम) येथे गुरूवारी पोहोचण्यास सांगितले. तिथे शहाचा एक माणूस पैसे घेऊन त्यांना पास देणार होता. शहाच्या सूचनेनुसार तिघे युवक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे पैसे दिले. नंतर शहाने त्यांना योगी नगर येथील पत्ता दिला आणि तेथे पोहोचून पास घेण्यास सांगितले. तिघेही मित्र योगी नगर येथे पोहोचले असता त्यांना सांगितलेली इमारत सापडलीच नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिने आपल्या संस्कृतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. गरबा प्रकार तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूँ में, यांसारखी तिची अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…

गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!