पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे.

पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यास सांगितले आहे. पुणे पोलिसांनी बुलेटचालकांवर कारवाई केली आहे. सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या बुलेटचालकांवर कलम १८४ अंतर्गत भरधाव आणि धोकादायकपणे वाहन चालविण्याचे कलम लावण्यास सुरुवात केली आहे.

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा पद्धतीने बदल करणाऱ्या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव ‘आरटीओ’कडे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे अशा बुलेटचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित होणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालविणाऱ्यांवर मोठी कारवाई केली असून, त्यांच्यावर लाखो रुपयांचा दंड लावला आहे. दुचाकीला मूळ सायलेन्सर बसविल्यावरच दुचाकी सोडली जात आहे.

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!