वैद्यकिय विक्री प्रतिनिधीची आत्महत्या; वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

नाशिक : कंपनीच्या सेल प्रेशरच्या त्रासाला कंटाळून एका वैद्यकीय विक्री प्रतिनिधीने (एम.आर) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे घडली आहे. तुषार अशोक शिंपी (३२, रा. शुभम पार्क, सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

तुषार अशोक शिंपी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मॅनेजर देशपांडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. पोलिसांनी पत्रातील नावाप्रमाणे संशयित एरिया व्यवस्थापक अमोल देशपांडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध कंपनीमध्ये नाशिकसाठी एमआर म्हणून तुषार नोकरी करत होता. त्याने कंपनीच्या एरिया मॅनेजरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून राहत्या घरी बुधवारी (ता. १२) गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबड पोलिसांना तपासात तुषार याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी घटनास्थळी पंचनामा करताना आढळून आली. या चिठ्ठीच्या पुराव्यावरून पोलिसांनी संशयित देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची दाखल एम आर युनियनने घेतली असून तुषारला योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली.

दरम्यान, तुषारच्या मागे आई, वडील, पत्नी, तीन वर्षांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील शेतकरी व भाऊ सुद्धा एमआर म्हणून नोकरी करतो.

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!