पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे.

वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीचा हा अपघात बुधवारी रात्री सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील पंचकोसी रेल्वे क्रॉसिंगजवळ घडला. गोविंद सोनकर हा व्यक्ती सतत दारूच्या नशेत असायचा, त्यामुळे त्याची पत्नी खुशबू सोनकर त्याच्यावर चिडत असे. दारूवरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. बुधवारी रात्रीही गोविंद दारूच्या नशेत घरी आला असता खुशबूने त्याच्याशी भांडण केले. खुशबू रागाच्या भरात रेल्वे रुळाकडे गेली. गोविंदही नशेतच तिच्या मागे मागे रुळावर आला.

दारूवरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. गोविंदने खुशबूला वारंवार मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, गोविंदने खुशबूला मिठी मारली तेव्हा त्याच ट्रॅकवर एक अतिशय वेगवान ट्रेन आली. दोघांनाही रुळावरून दूर जाण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. अपघातात बळी पडलेल्या पती-पत्नीला तीन मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा 6 वर्षांचा तर 3 आणि 4 वर्षांच्या दोन मुली आहेत. गोविंद हा उदरनिर्वाहासाठी फळे विकायचा. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिलेसह दोन चिमुकल्यांचे आढळले मृतदेह; नवरा बेशुद्ध करायचा…

पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!