Video: इस्त्राईलच्या 13 सैनिकानी केली 250 जणांची सुटका, थरारक…

जेरुसलेमः इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या यु्द्धामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत.

इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि 250 ओलिसांची सुटका केली. संबंधित घटनेचा थरारक व्हिडिओ इस्त्राईलने समोर आणला आहे. यामध्ये इस्राईलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे पकडून मारत आहेत, याचे चित्रिकरण दिसत आहे.

फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडीओत एका अंधारलेल्या खोलीच्या मजल्यावर मृतदेह दिसत आहेत. दुसर्‍या खोलीत, सैन्याने प्रवेश केल्यावर लोकांचा एक गट उभा दिसतो. हे बहुधा ओलीस असावेत असे दिसते. बंकरमध्ये रहा, आम्ही येत आहोत, असे एक अधिकारी ओरडत आहे.

इस्राईलच्या सुरक्षा दलाने उत्तरेकडील गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना आणीबाणीचा इशारा दिला आहे. येथील 10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना इस्राईलने पुढील 24 तासांमध्ये गाझा पट्टी खाली करण्यास सांगितले आहे. आम्ही या ठिकाणी मोठा हल्ला करणार असून तातडीने हा प्रदेश खाली करावा असे सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनाही यासंदर्भातील माहिती इस्राईलकडून देण्यात आली आहे.

इस्राईल युद्ध! मृत्यूचे तांडव, महिलांवर अत्याचार; हृदय पिळवटून टाकणारे Video…

Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!