पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…
पालघर : वाडा पोलिसांनी 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम एटीएममध्ये जमा करण्यासाठी होती की निवडणुकीच्या प्रचारासाठी या पैशाचा वापर होणार होता, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भरारी पथकाकडून मुद्देमाल जप्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुक आचार संहिता पथकातील वाडा पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी हा गुन्हा काही वेळातच उघड केला आहे. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात गणेशोत्सव काळात चोरांवर राहणार करडी नजर: पोलिस आयुक्त
पुणे: गणेशोत्सवादरम्यान अनेकदा सोने, पाकिटे, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या चोऱ्या होत असतात, या काळात कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा यासाठी पुणे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर गुन्हे करणाऱ्यांवर राहणार आहे. याबबात गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय,अतिरिक्त आयुक्त कार्यालय आणि […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…
मुंबई : मुंबईत झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या मजल्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू; चार महिलांची हत्या अन् छेड…
अहमदनगर: चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना सुगाव (ता. अकोला) येथे घडली आहे. अण्णा वैद्य असे जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचे काम […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; विषारी सापांचं विष…
मुंबईः ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला […]
अधिक वाचा...वैद्यकिय विक्री प्रतिनिधीची आत्महत्या; वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…
नाशिक : कंपनीच्या सेल प्रेशरच्या त्रासाला कंटाळून एका वैद्यकीय विक्री प्रतिनिधीने (एम.आर) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे घडली आहे. तुषार अशोक शिंपी (३२, रा. शुभम पार्क, सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तुषार अशोक शिंपी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मॅनेजर देशपांडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…
मुंबईः मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही […]
अधिक वाचा...
