
कोल्हापूर हादरलं! मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे केला खून…
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास जन्मदात्या मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
विजयमाला नारायण भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खून केल्यानंतर संशयित मुलगा सुनील (वय 48) स्वतःहून हुपरी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुनिल नारायण भोसले (वय 48) याला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक तपासात संशयित सुनीलने अत्यंत थंड रक्ताने खून केल्याचे समोर येत आहे. आई विजयमाला यांच्या हाताची नस काचेसारख्या धारधार वस्तूने कापली. चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी घाव घातले. वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने वार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खूनामागे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण आहे का, याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण हुपरी शहरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…
कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…
कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…

