भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…

रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत गोंधळ घातला. या प्रकरणी माजी मंत्री आणि कुरुदचे भाजप उमेदवार अजय चंद्राकर यांनी निवड यांनी निवडणूक आयोगात तक्रार करून धमतरी एसपी यांच्यासह टीआय आणि एसडीओपी यांना हटवण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर यांचा भावांसोबत मालमत्तेवरून वाद सुरू होता. याआधीही त्यांचा आणि भावांचा वाद झाला होता. पोलिसांत या प्रकरणी तक्रारही दाखल झाली होती. आज सकाळी ८ ते १० जण काठ्या, लोखंडी रॉड घेऊन चंद्रशेखर यांच्या घरात घुसले. घराचा दरवाजा तोडून त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रशेखर आणि त्यांची पत्नीही जखमी झाली. दोघांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी चंद्रशेखर यांना मृत घोषित केले. यानंतर कुरुद पोलीस ठाण्याबाहेर भाजपने जोरदार गोंधळ करत हल्लेखोर काँग्रेसचे असल्याचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…

वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!