सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन […]

अधिक वाचा...

UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

अकोला : अकोला येथील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक बांबीवर तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. अंजली अनिल गोपनारायण हिने काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा...

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पोलिस ठाण्याच्या प्रभारी महिला निरीक्षकाला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. महिला आग्रा पोलिस दलामध्ये पोलिस निरीक्षक आहे. तिचा प्रियकर पवन कुमार हा देखील मुझफ्फरनगरमध्ये पोलिस आहे. दुपारी पवन कुमार त्याची गर्लफ्रेंड असलेल्या महिला […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…

हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरा समलिंगी असल्याचे समजल्यानंतर नवरीला मोठा धक्का बसला. कारण, नवरा मुलीसारखा मेकअप करून बेडरूममध्ये आला होता. या घटनेमुळे युवतीसह तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेवाची वाट पाहात बसलेल्या वधू धक्का बसला आणि संसार सुरू होताच उद्ध्वस्त झाला. […]

अधिक वाचा...

एका बायकोसाठी दोन नवरे भांडत पोहचले पोलिसस्टेशनमध्ये; अखेर…

पाटणा (बिहार): एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते. हा गोंधळ बराच वेळ सुरू राहिला. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. पोलिस स्टेशनमध्ये दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला. अखेर, महिलेने दोन पतींपैकी एकाची निवड केली. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित […]

अधिक वाचा...

सातारा पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करून नागरिकांना केले परत…

साताराः मल्हारपेठ पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचे गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच […]

अधिक वाचा...

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चौघांना वरिष्ठ वकीलाचा दर्जा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ॲड. अक्षय नाईक, ॲड. देवेंद्र चव्हाण, ॲड. मोहन सुदामे व ॲड. फिरदौस मिर्झा आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला आहे. वरिष्ठ वकीलाचा दर्जा १८ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…

नाशिक: नाशिकमध्ये जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या […]

अधिक वाचा...

सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

सोलापूर : मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन झालेल्या त्याच्या विधवा पत्नीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला ही विडी कामगार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!