नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…

नाशिक: नाशिकमध्ये जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात प्रमोद रामदास वाघ (वय 38) याचा मृत्यू झाला आहे. सिन्नर फाटा परिसरात यश टायर दुकान असून तेथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ हे सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवले. जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने वाघ याच्यावर रॉडने हल्ला केला. त्यात वाघ गंभीर जखमी झाला. वार वर्मी लागल्यामुळे वाघ जागेवर कोसळला. आरोपी योगेश पगारे याने एकापाठोपाठ असे 13 वेळा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.

प्रमोद वाघ यांना उपचारासाठी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळतात नाशिकरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, एकीकडे ही हत्येची घटना घडलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येच एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. आठ ते दहा जणांनी केलेल्या या हल्यात पोलिस निरीक्षक सुनील पवार जखमी झाले. त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. तर उपनिरीक्षक सविता उंडे यांच्याशी शिवीगाळ करत त्यांच्यावर धक्काबुक्की करण्यात आली. नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत.

नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…

नाशिक पोलिसांनी कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड अन्…

नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…

नाशिक पोलिसांना पेट्रोलिंग करताना कार संशयास्पद आढळून आली अन्…

नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…

नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!