
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) येथील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. पण, कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते एकापाठोपाठ एक पाण्यात बुडाले.
दरम्यान, पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडारदरा धरणात बुडून युवकाचा मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…
पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…

